गुरुवार, १६ जुलै, २००९

चोराच्या उलट्या बोंबा !!

४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल।दिवाळीचा सुमार होता. माझ्या एका काकाने कोकणात- दापोलीला नुकतंच घर बांधलं होतं. भाऊबीजेच्या निमित्ताने सर्व नतेवाईकांचं एक गेट-टूगेदर त्याने ठेवलं होतं. तेव्हा आलेला एक अनुभव इथे देत आहे. चोर तो चोर वर शिरजोर म्हणतात ना तसाच काहिसा अनुभव आम्हाला आला.

आम्ही ठरवल्याप्रमाणे ठरवलेल्या दिवशी दुपारी ३ वाजता सुमो दारात आली. गाडीवाल्याचं
नाव ओळखीच्याच एका व्यक्तीकडून कळल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो। गाडीचा मालक आणि driver दोघही आले होते. आम्ही सर्व सामान गाडीत भरलं आणि आमचा प्रवास सुरू झाला. थोडं पुढे गेल्यावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गाडी थांबवली. मालकाने माझ्या वडिलांकडून ८००-८५० रुपये मागून घेतले. "शेवटी हिशोब करताना तेवढे कापून घ्या साहेब', असं म्हणाला. ठीक आहे असं म्हणून बाबांनीही पैसे दिले. मालक पेट्रोल पंपवरच उतरला आणि आम्ही पुढे निघालो. माहीमपासून जेमतेम सायन पर्यन्त पोचलो असू आणि आमच्या driver च्या लक्षात आलं की गाडीचे ब्रेक्स नीट काम करत नाहियेत. आता आली का पंचाईत! गाडी दुरुस्तं व्हायला बराच वेळ लागला असता. दापोलीपर्यंत जायचं म्हणजे ५-६ तास तरी लगणार होते. आणि अशा परिस्थितीत गाडी पुढे दामटणं अशक्य होतं. म्हणून आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला.


गाडीच्या मालकाला तिथूनच फोन करून आमचा निर्णय कळवला आणि आम्ही मागे फिरलो.
या गोष्टीला साधारण महीना झाला असेल तरी त्या गाडीवाल्याचं आमचे पैसे परत करण्याचं काही चिन्हं दिसेना. प्रथम १-२ वेळा त्याने माझ्या बाबांना "देतो साहेब थोडी तंगी आहे" वगैरे कारणं देऊन टाळलं. नंतर नंतर त्याच्या अवाजात मगरूरी येऊ लागली, "देईन हो साहेब काय घाई आहे तुम्हाला?" माझ्या बाबांचा स्वभाव मुळातच वाद-विवाद करण्याचा नसल्यामुळे त्यांनीही दुर्लक्ष केलं. पण नंतर मात्रं त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे एक लास्ट चान्स घेण्यासाठी म्हणून परत फोन केला। आणि त्या महाशयांचं उत्तर ऐकून आम्ही गार झालो!!!

तो माझ्या वडिलांच्या अंगावर जवळ जवळ खेकसला आणि म्हणाला, "तुम्हाला एकदा पैसे देतो म्हणून सांगून कळत नाही? सारखा सारखा फोन करता ते? नाही देत पैसे। काय कराल? याद राखा मला परत फोन केलात तर, बघून घेईन तुम्हाला". हे उत्तर ऐकून आम्ही हैराण झालो. आम्हाला त्या ८०० रुपयांनी काही फार फरक पडत होता असं नाही, पण आपलेच पैसे असून आपल्यालाच मागायची चोरी या गोष्टीचं आश्चर्यं वाटलं आणि 'दुर्जनं प्रथमं वंदे' असं म्हणून आम्ही त्या पैशांवर पाणी सोडलं.

३ टिप्पण्या:

  1. श्रेया, अगदी अस्साच अनुभव आमच्याही गाठीला आहे.ते तर शिक्षक होते(म्हंजे तसा आव आणला होता)आमचे १५०० रु दिले नाहीतच वर सारखा काय विषय काढता म्हणून दमदाटीही केली. अशा वागण्याने या लोकांना काय मिळत खरचं कळत नाही!

    उत्तर द्याहटवा
  2. थँक्स. खरंच, असं वागून यांच्या मनाला बोच कशी लागत नाही याचं आश्चर्यं वाटतं!

    उत्तर द्याहटवा
  3. Aga tu ha prasang lihila aahes? Mala watla ki aaplyala Dapolila pochayla kiti ushir zala ani kirr andharatun adhi aapan eka veglyach gharapashi gelo ani bakichi dhamal asa lihinar aahes. Any way ha prasang mhanje tar mansanchya irsalpanacha namuna aahe.

    उत्तर द्याहटवा